Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

ट्रेडजइन्वेस्टमेंट कंपनीच्या संचालकांना अटक

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

सव्वा दोन कोटींचा गंडा, आरोपींना हैद्राबादमधून बेड्या

marathinew24.com

पुणे – गुंतवणूकीवर आठ टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी ३८ लाख ५० हजारांची फसवणूक करणार्‍या ट्रेडजइन्वेस्टमेंट प्रा. लि. कंपनीच्या संचालकांना पुणे पोलिसांच्या आर्थिंक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण थांबेना; सरकारने लक्ष देण्याची मागणी – सविस्तर बतमी 

सचिन खडतरे (रा. करकंब पंढरपूर, सोलापूर), प्रसाद कुलकर्णी (वय ३६ रा. सारंग सोसायटी नांदेडसिटी पुणे ) यांना अटक केली आहे. तर नवनाथ जगन्नाथ अवताडे, अगस्त राहूल मिश्रा, राहूल श्यामराव काळोखे, सचिन लक्ष्मण खडतरे, चेतन धर, प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी, ययाती राहूल मिश्रा, गौरव देवीदास सुखेदव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

ट्रेडजइन्वेस्टमेंट प्रा. लि. कंपनीच्या संचालकांनी तक्रारदाराला शेअर मार्वेâटमध्ये काम करीत असल्याचे सांगितले होते. गुंतवणूकीवर महिन्याला सहा ते आठ टक्के देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर संबंधितांनी तक्रारदाराकडून तब्बल २ कोटी ३८ लाखांवर रक्कम स्वीकारली. त्यानंतर ट्रेडज ऑनलाईन पोर्टलवर खोटा परतावा दाखवला होता. याप्रकरणी तक्रारदाराने विड्रॉवल रिक्वेस्ट पाठवली असता, त्यांना परतावा दिला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी परदेशात पळून गेल्याची शक्यता होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्याविरूद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आले होते.

गुन्ह्यातील आरोपी सचिन खडतरे आणि प्रसाद कुलकर्णी हे ३० डिसेंबरला शारजा ते हैद्राबाद असा विमानप्रवास करत होते. त्याची माहिती पुणे पोलिसांच्या आर्थिंक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार एपीआय चेतन मोरे, राजेश लांघी, विनोद चव्हाण, मुसळे यांनी हैद्राबादमधील विमानतळ परिसरात सापळा रचला. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना एमपीआयडी न्यायालयात हजर केले. त्यानुसार दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी शुभदा संखे, वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळीस यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×