Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

केज तहसीलसमोर लांडगे कुटुंबीयांचा आत्महदहनाचा प्रयत्न

केज तहसीलसमोर लांडगे कुटुंबीयांचा आत्महदहनाचा प्रयत्न

जमिनीची मोजणी व सीमांकन करण्याची मागणीकडे दुर्लक्ष

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जमिनीचे सीमांकन करण्याबाबत निश्चित वेळ देऊन ही संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित न राहिल्याने संतप्त झालेल्या लांडगे कुटुंबीयांनी सोमवारी (दि.१२) दुपारी केज तहसील कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी धावाधाव करीत त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. केज येथील विष्णू श्रीमंत लांडगे व त्यांच्या पाच भावांना सर्व्हे क्रमांक ३०/१ व ३०/२ मधील प्रत्येकी ३२.४४ आर जमीन केजच्या दिवाणी न्यायालयाच्या (क स्तर) दिवाणी दावा क्रमांक ७५/२०२४ मधील अंतिम हुकूमनाम्यानुसार वाटप झाली आहे.

आरटीओचे बनावट चलन पाठवून केली फसवणूक – सविस्तर बातमी 

न्यायालयीन आदेशानुसार मिळालेल्या जमिनीची नोंद महसूल अभिलेखात घेण्यात आली असून वाटप तक्ता तयार करण्यासाठी जमिनीची मोजणी करण्याचे आदेश तहसील कार्यालयाने १३ मार्च २०२५ रोजी भूमि अभिलेख कार्यालयाला दिले होते. या जमिनीच्या मोजणीसाठी ८ डिसेंबर २०२५ रोजी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र मोजणीच्या वेळी अतिक्रमणधारकांनी विरोध करत मोजणीस मज्जाव केला होता. त्यामुळे अतिक्रमण काढून टाकून जमिनीची रीतसर मोजणी करून अहवालानुसार चतुःसीमा निश्चित करून देण्याची मागणी लांडगे कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. तर या मागणीसाठी ८ ते १२ डिसेंबर दरम्यान लांडगे कुटुंबातील महिला व लहान मुलांनी तहसील कार्यालयासमोर चार दिवस उपोषण केले होते. यावेळी तहसीलदारांनी १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जमिनीचे सीमांकन करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र दिलेल्या वेळेत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

प्रतीक्षा करून १२ जानेवारी दुपारी ४ वाजता तहसील कार्यालयात विष्णू लांडगे, महादेव लांडगे, शंकर लांडगे, बळी लांडगे, शांताबाई लांडगे, संध्या लांडगे व सोजर लांडगे अशा सात जणांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×