Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

खूनातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू

marathinews24.com

पुणे – खून प्रकरणातील आरोपी पोलिसांना धक्का देऊन पसार झाल्याची घटना वडगाव बुद्रुक परिसरात घडली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, त्याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. लक्ष्मी विहा अपार्टमेंट, रोकडोबा मंदिराजवळ, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता ) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याप्रकरणी वाघमारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी रस्ता परिसरात जुन्या वाड्याला आग – सविस्तर बातमी

रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई श्रीकांत किरवले (वय २९) यांनी याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरीतील तरुणाचा महाबळेश्वरला फिरायला नेण्याच्या बहाण्याने मित्रांनीच ताम्हिणी घाटात खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आदित्य गणेश भगत (वय २२, रा. साई रेसिडेन्सी, इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ रा. चोबे पिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. लक्ष्मीविहार अपार्टमेंट, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता), तुषार ऊर्फ सोन्या शरद पाटोळे (वय २४, रा. सुशील गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बाणेर परिसरातून वाघमारे आणि साथीदार पाटोळे यांना अटक करण्यात आली. मित्राची चोरलेली मोटार विकण्याच्या प्रयत्नात आरोपी होते. बाणेर पोलिसांनी वाघमारे आणि पाटोळे यांना माणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्याननंतर माणगाव पोलिसांचे पथक वाघमारेला घेऊन तपासासाठी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात बुधवारी (१४ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आले. पोलिसांनी घराचा पंचनामा केला. वाघमारे पोलिसांच्या ताब्यात होता. पोलीस शिपाई किरवले यांना धक्का देऊन वाघमारे पसार झाला. त्यानंतर माणगाव पोलिसांनी या घटनेची माहिती सिंहगड रस्ता पोलिसांना दिली. पसार झालेल्या वाघमारेचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×