Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

अल्पवयीन पीडितेचा २४ तासात पोलिसांनी लावला शोध

बीड पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक

marathinews24.com

बीड – (अनंत जाधव) – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अत्यंत कौशल्याने तपास करत ताबा मिळाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत अल्पवयीन पीडित मुलीचा शोध लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा (ता. संग्रामपूर) येथे करण्यात आली.

अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला हटकल्याने ज्येष्ठाला मारहाण – सविस्तर बातमी

बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद रजिस्टर नंबर २०७/२०२५, कलम १३७ (२) अन्वये दाखल असलेला एक गुन्हा तपासासाठी १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी मूळ फाईलचे अवलोकन करून फिर्यादी व साक्षीदारांकडून सखोल माहिती घेतली. तांत्रिक माहितीच्या आधारे, पीडित मुलगी आणि आरोपी रोशन गवई (रा. सोनाळा, जि. बुलढाणा) हे बुलढाणा जिल्ह्यात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशाने १५ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता एएचटीयूचे पथक तातडीने बुलढाण्याकडे रवाना करण्यात आले . १६ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पथकाने संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे सापळा रचून पीडित मुलगी आणि आरोपीला ताब्यात घेतले.

स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतर पथक सकाळी ९ वाजेपर्यंत बीडमध्ये दाखल झाले. बीडला पोहोचल्यानंतर पीडित मुलीचे समुपदेशन करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले, तर आरोपीला पुढील कारवाईसाठी बीड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे, पोलीस शिपाई योगेश निर्धार, गजानन चौधरी (सर्व एएचटीयू, बीड) यांनी पार पाडली. अवघ्या २४ तासांत आरोपीला जेरबंद केल्यामुळे बीड पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×