घोले रस्ता परिसरात झाला अपघात
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती भागात भरधाव कार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १५ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घोले रस्ता परिसरात घडला आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेणुकदास नारायण जोशी (वय ६५) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी योगेश जावळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात असाही चोरटा…महिलांचे फक्त अंतर्वस्त्रे चोरायचा – सविस्तर माहीती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रेणुकदास जोशी हे १५ एप्रिलला दुपारी साडेतीनच्या सुमारास झाशीची राणी चौकातून घोले रस्त्याकडे निघाले होते. त्यावेळी झाशीची राणी चौकातील कोपर्यावर कार चालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे अपघातात जोशी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.
त्या ४ हॉटेलमुळे वाहतूककोंडी, अपघातांचे प्रमाण वाढले
मध्यवर्ती घोले रस्ता परिसरात ३ ते ४ हॉटेल असून, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खवय्यांची गर्दी होते. त्यामुळे परिसरात वारंवार वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. झाशीची राणी चौकातील सिग्नल सुटल्यानंतर भरधाव वेगाने वाहने तिथे येतात. त्याचवेळी घोले रस्त्यावर हॉटेलमधून बाहेर पडणार्या मोटारी, गर्दीमुळे त्या भागात कायम वाहतूककोंडी होते. नामांकित नॉनव्हेज हॉटेलसह आईस्क्रीम दुकानाबाहेर बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे परिसरातून चालणेही अवघड झाल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. मात्र, डेक्कन वाहतूक पोलिसांकडून जाणूनबुजून कारवाई केली जात नाही.