अनैसर्गिक संबंधाला नकार दिला, रागातून गळा चिरून केला खून

आरोपी २४ तासांत गजाआड; पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची कामगिरी

marathinews24.com

पुणे – अनैसर्गिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग आल्यामुळे नशेत असलेल्या तरुणाने एकाचा गळा चिरून खून केल्याची घटना मंडई मेट्रो स्टेशनसमोरील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली होती. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीच्या अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या आहेत. हा खून ४ जूनला झाला होता. रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. कातरड, ता. राहुरी, जि.अहिल्यानगर) याला शिरूर येथून ताब्यात घेत अटक करण्यात आले आहे.

कोथरूडमध्ये मिटर रूमला लागलेल्या आगीत दोन जण जखमी – सविस्तर बातमी

अनोळखी व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह मंडई परिसरात मेट्रो रेल्वे स्टेशनजवळ आढळून आला होता. ही घटना समजताच विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. संबंधिताला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम १०३(१) अंतर्गत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार युनिट एकने गुन्हा उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास सुरू केला.

सीसीटीव्ही कॅमेरे आणि बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीचा छडा लावत रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. कातरड, ता. राहुरी, जि.अहिल्यानगर) याला शिरूर येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अनैसर्गिक संबंधांवरील वादातून हा खून केल्याची कबुली दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, निलेश जाधव, अभिनव लडकत, अमित जमदाडे, निलेश साबळे, शुभम देसाई यांनी केली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top