Breking News
पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन

नामवंत गायक व कलाकारांच्या सहभागातून देशभक्तीपर सादरीकरण

marathinews24.com

पुणे – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध ठिकाणी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, पुणे महसूल विभागासाठी ‘वंदे मातरम्’ हा देशभक्तीपर गीत व नृत्याविष्काराचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पंडित भीमसेन जोशी नाट्यमंदिर, औंध, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’चा यशस्वी समारोप – सविस्तर बातमी

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. देशभक्तीची भावना जागविणाऱ्या मराठी व हिंदी गीतांसह नृत्याविष्कारातून या कार्यक्रमात राष्ट्रप्रेमाचा जागर केला जाणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक डॉ.अभिजित कोसंबी, दीक्षा जाधव, भूमी जाधव यांच्यासह मराठी संगीत मालिकेतील वादक सुनील जाधव, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिटीवादक निखिल राणे सहभागी होणार असून, सुरेल मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे.

किंकणी कला ॲकॅडमी निर्मित या कार्यक्रमात गीत, संगीत आणि नृत्याचा सुरेख संगम सादर होणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या देशभक्तीपर सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×