Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

लोकभवन येथे राज्यपाल देवव्रत आचार्य यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत सदिच्छा भेट

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विकासावर चर्चा

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांच्या वतीने लोकभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या “स्वागत समारंभा”साठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना सस्नेह आमंत्रण देण्यात आले होते. याप्रसंगी राज्यपालांच्या पत्नी सौ. दर्शना देवी यांचीही उपस्थिती होती. या निमित्ताने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मा. राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांची सदिच्छा भेट घेतली.

पोलीस दलातील गावडे, शिळीमकर, सावंत, कोरे, धनगर, लांडे यांचा सन्मान – सविस्तर बातमी

या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी “महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव” या विशेष पुस्तकाची भेट राज्यपालांना दिली. या पुस्तकामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव तसेच राज्याच्या विकासाला दिशा देणारी धोरणे यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेचा आणि विधानपरिषदेच्या योगदानाचा ऐतिहासिक आढावा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.

या सदिच्छा भेटीत राज्याच्या घटनात्मक परंपरा, लोकशाही मूल्ये आणि विधानपरिषदेच्या कार्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. स्वागत समारंभाच्या निमित्ताने झालेली ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विकासात्मक वाटचालीसंदर्भात अनौपचारिक संवाद झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×