Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बनावट नोटांचे केज कनेक्शन उघड

चक्क माजी सरपंच अडकला तमिळनाडूत बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये

marathinews24.com

बीड – (अनंत जाधव) – तामिळनाडू पोलिसांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील डोका गावातील माजी सरपंचासह एका व्यापाऱ्याला ८ लाख ३७ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले आहे . तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात थुवकुडी पोलिसांनी २१ जानेवारी रोजी ही कारवाई केली आहे.

पुण्यात चक्क ट्राफिक सिग्नलमधील बॅटर्‍याच चोरल्या – सविस्तर बातमी

केज तालुक्यातील डोका येथील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे, वय (५४ वर्ष) आणि व्यापारी नारायण राम, वय (३४ वर्ष) हे दोघे कार क्र. (एम एच- ४४/झेड-२३८३) तामिळनाडू राज्यात गेले होते. २१ जानेवारी रोजी तिरुचिरापल्लीतील थुवकुडी येथील पेट्रोल पंपावर त्यांनी इंधन भरल्या नंतर पेट्रोल पंपावर बनावट नोट दिली होती. या बनावट नोटा असल्याचे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना कळविली. त्या नंतर तामिळनाडू पोलिसांनी त्यांची कार चेकपोस्टवर अडवून कारची झडती घेतली असता त्यात पोलिसांना २०० रुपयांच्या नोटांची ४१ बंडले आढळली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांच्या ताब्यातील रमेश भांगे आणि नारायण राम या दोघांनी थुवकुडीपूर्वी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागातही बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. आणखी कुठे कुठे बनावट नोटा चलनात आणल्या. बनावट नोटा कोठून आणल्या आणि त्या कुठे छापल्या? या नोटांचे तामिळनाडू कनेक्शन काय आहे? याचा तपास सुरू आहे. दरम्यान बनावट नोटांच्या रॅकेटमुळे बीड जिल्हा आणि केज तालुका पुन्हा चर्चेत आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×