Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

मोटारीतून सोडण्याची बतावणी; तरुणाला लुटले

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटले

येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटारीतून पुणे स्टेशनला सोडण्याची बतावणी करुन मोटार चालक आणि साथीदारांनी तरुणाला लुटल्याची घटना नगर रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी मोटार चालकासह त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोटार चालकासह त्याच्याबरोबर असलेल्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यातून पसार होण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण सोमवार पेठेतील नरपरतगिरी चौकात राहायला आहे. ३० जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास नगर रस्ता परिसरात स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत थांबला होता. त्या वेळी मोटार चालक आणि साथीदार मोटारीतून तेथे आले. आरोपींनी तरुणाला पुणे स्टेशनपयर्यंत सोडतो, अशी बतावणी केली. त्यानंतर तरुणाला मोटार चालक आणि साथीदारांनी मारहाण केली. त्याला नगर रस्ता, बंडगार्डन रस्ता परिसरातून नेण्यात आले. तरुणाला जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने १८ हजार रुपये घेतले. तरुणाला रस्त्यात सोडून आरोपी मोटार चालक साथीदारांसह पसार झाला. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×