Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

मद्यपान करून वाहन चालवणे भोवणार, गाडी जप्त होणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

मद्यपी वाहन चालकांची घेतली शाळा

marathinews24.com

पुणे – नागरिकांनो सावधान.. तुम्ही जर मद्यपान करून वाहन चालविल्यास तुमचे वाहन जप्त होउ शकते. पुणे पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई जोरदारपणे सुरू केली आहे. दोन पेक्षा अधिकवेळा मद्यपान करून वाहन चालविताना आढळून आल्यास संबंधिताची गाडी जप्त केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पोलीस मुख्यालयात रस्ता सुरक्षा अभियान, समुपदेशन आणि मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव उपस्थित होते.

शीतल तेजवाणी विरोधात १ हजार ८८६ पानांचे दोषारोपपत्र दाखल – सविस्तर बातमी

अमितेश कुमार म्हणाले, बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विशेषतः ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रीपल सीट वाहन चालकासह इतरांविरूद्ध कारवाई मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करून वाहन चालवावे, कारवाईमध्ये आढळून आल्यास संबधित व्यक्तीचा फोटो वेबसाईटवर पोस्ट केला जाणार आहे. तसेच त्या व्यक्तिच्या ऑफिसला नोटीस पाठविली जाणार असून, त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून माहिती दिली जाणार आहे. प्रामुख्याने दोन पेक्षा जास्त वेळा ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई झाल्याचे आढळून आल्यास संबधिताचे वाहन जप्त केले जाणार आहे.

पुण्यात ३०० जणांना रस्ते अपघात मृत्यू

शहरातंर्गत रस्ते अपघातात तब्बल ३०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मद्यपान केलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करावे. ट्रिपल सीट वाहन चालकांची संख्या देखील वाढली असून त्यांचे वाहनही जप्त केले जाणार आहे. कल्याणीनगरमध्ये २०२४ मध्ये अपघातामध्ये दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला होता. त्याप्रकरणी अल्पवयीन कार चालक आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांना १९ महिने कारागृहात राहावे लागले, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

अजित दादा कायम आठवणीत राहतील -अमितेश कुमार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला होता. पोलिस दलासाठी त्यांनी ३०० वाहने दिली. आयुक्तालयाच्या नविन इमारतीचे काम, नवीन पोलिस ठाणी, मनुष्यबळ यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी पोलिस दलासाठी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहतील अशी आठवण पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. पवारांकडे आम्ही अधिकाराने पोलिस खात्यासाठी मागणी करायत होतो.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×