Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

नांद्रे पंचकल्याणक महोत्सवात “महोत्सव जैन धर्मका

हर्षित अभिराज यांच्या भक्तिसंगीताची पर्वणी

marathinews24.com

पुणे – नांद्रे पंचकल्याणक महोत्सवाच्या पावन पर्वात जैन भक्तिसंगीताचा अविस्मरणीय अनुभव देणारा “महोत्सव जैन धर्मका” हा विशेष कार्यक्रम गायक व संगीतकार हर्षित अभिराज यांच्या सादरीकरणातून साकार होणार आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम भक्तांच्या साक्षीने नांद्रे येथे रंगणार आहे.

निरोगी, सुसंस्कृत व प्रगतशील समाज घडावा – सविस्तर बातमी

“ये पंचकल्याणक पावन है, ये उत्सव तो मनभावन है…” या ओळींनी सुरू होणारे “महोत्सव जैन धर्मका” हे गीत आज देशभरातील पंचकल्याणक महोत्सवांचे जणू थीम साँग बनले आहे. याच गाजलेल्या गीतासह आया महोत्सव, सोहळा जैन धर्माचा, आलाय उत्सव, ढोल बजाओ मंगल गावो तसेच नांद्रे पंचकल्याणकावर आधारित “पंचकल्याणक नांद्रे नगरिका” आणि “पंचकल्याणक णमोकार तीर्थका” ही सध्या लोकप्रिय असलेली गीते हर्षित अभिराज सादर करणार आहेत. लोकसंगीतावर आधारित जैन भक्ती गीते व काही कन्नड जैन भक्ती गीतांचाही समावेश या कार्यक्रमात असेल.

नांद्रे येथे बालपण गेलेल्या हर्षित अभिराज यांना याच मातीमध्ये महावीर भजनी मंडळाच्या माध्यमातून गायनाची प्रेरणा मिळाली. डॉ. एस. पी. बाल सुब्रमण्यम, हरिहरन, कैलाश खेर, अनुराधा पौडवाल, आनंद शिंदे, जावेद अली यांच्यासह त्यांनी काम केले असून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, जॅकी श्रॉफ, गोविंदा, मीनाक्षी शेषाद्री यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमात ते रविंद्र जैन व लता मंगेशकर यांना जैन गीतांच्या माध्यमातून स्वरसुमनांजली अर्पण करणार आहेत.

कार्यक्रमाचे संगीत संयोजन मंगेश सारंग यांचे असून मंच संचालन राजेंद्र जैन करणार आहेत. नांद्रे व पंचक्रोशीतील संगीत रसिकांनी या मुक्त प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन हर्षित अभिराज यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×