पुण्यात पोलीस आयुक्तांचा दरबार; १५० पोलीस अंमलदारांच्या केल्या विनंती बदल्या

 पुण्यात पोलीस आयुक्तांचा दरबार; १५० पोलीस अंमलदारांच्या केल्या विनंती बदल्या

कॉप्स-२४ चे अंमलदारही पोलिस ठाण्याकडे

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या १५० पेक्षा अधिक अंमलदारांची विनंती बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित बदल्या केल्या आहेत. आयुक्तालयातील कॉप्स एक्सलन्स हॉलमध्ये दरबार भरवून त्यांच्या समोर पारदर्शकपने बदल्या केल्या आहेत. यासाठी तब्बल ४३३ पोलिस अंमलदारांनी विनंती अर्ज केले होते.

हास्यातून मिळते ताण तणावातून मुक्ती-भारत सासणे – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखेच्या कॉप्स -२४ मध्ये काम करणाऱ्या ५७४ पोलीस अंमलदारांच्या देखील बदल्या पोलिस ठाण्यात केल्या आहेत. शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पोलिस ठाण्यात सद्य परिस्थितीत कमी असलेल्या मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर कॉप्स -२४ मधील अंमलदारांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान, यापुर्वी कॉप्स -२४ कर्मचाऱ्यांवर गुन्हे शाखेचे नियंत्रण होते. गुन्हे शाखेच्या माध्यमातूनच त्यांचे कामकाज चालत होते. मात्र जरी हे कॉप्सचे अंमलदार पोलिस ठाण्यात नेमणूकीस असले तरी त्यांच्यावर नियंत्रण हे त्या-त्या परिमंडळाचे पोलिस उपायुक्त ठेवणार आहेत. अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

बदली प्रक्रिया हा अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी महत्वाचा भाग असतो. प्रत्येक वर्षी कार्यकाळ पुर्ण झालेल्या अंमलदारांच्या बदल्या केल्या जातात. त्यामध्ये काही विनंती बदल्या देखील असतात. त्यानुसार बुधवारी सकाळी दरबार भरवून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक अंमलदाराला तीन पर्याय देण्यास सांगून त्याच्याच समोर त्यातील एक ठिकाणी अंमलदाराची बदली करण्यात आली आहे. यावेळी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुर्वी बीट मार्शल म्हणून काम करणाऱ्या पोलिसांचे अद्यावतीकरण करून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतंत्र अशा कॉप्स -24 या उपक्रमाची सुरुवात केली होती. पोलिस मुख्यालयात हजर झालेल्या नव्या दमाच्या अंमलदारांची येथे नेमणूक करण्यात आली होती. हद्दीत गस्त घालणे, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, मदतीचा कॉल मिळताच तात्काळ तेथे हजर होणे अशी कामे कॉप्स 24 च्या खांद्यावर होती. आता त्यांची पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×