Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

हास्यातून मिळते ताण तणावातून मुक्ती-भारत सासणे

हास्यातून मिळते ताण तणावातून मुक्ती-भारत सासणे

महामाता रमाई महोत्सवात रंगला बण्डा जोशी यांचा हास्यपंचमी कार्यक्रम

marathinews24.com

पुणे – सध्याचा भोवताल पाहता माणसाला जगणे सुसह्य होण्यासाठी आनंदी राहणे गरजचे आहे. हसण्यामुळे, आनंदी राहण्यामुळे समस्यांकडे बघण्याचा निर्मळ दृष्टीकोन प्राप्त होतो. आनंद, हास्य आपल्याला ताणतणावातून मुक्त करते, असे मत ज्येष्ठ कथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय समितीतर्फे आयोजित केलेल्या महामाता रमाई महोत्सवात बुधवारी (दि. ४) ज्येष्ठ एकपात्री कलावंत बण्डा जोशी यांचा ‘हास्यपंचमी’ हा कार्यक्रमाचे आयोजित केला होते. या कार्यक्रमात जोशी यांचा ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचा हस्ते सत्कार केला. रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, महोत्सवाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू मंचावर होते.

पुण्यात ऑपरेशन मुस्कान जोरात, मुलींसह बालकांचा शोध – सविस्तर बातमी 

सासणे म्हणाले, सध्याच्या तणावग्रस्त परिस्थिती पाहता बंडा जोशी यांच्या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित होते. रमाई महोत्सवात हास्यपंचमी कार्यक्रमाचे आयोजन आणि त्यांचा सत्कार उचीत आहे. पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्या प्रमाणे, ‘जिथे एक कलावंत बोलत असतो आणि लोक खळखळून हसत असतात, ते जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य असतं’ याची प्रचिती बण्डा जोशी यांच्या कार्यक्रमातून पुणेकरांनी या वेळी आली. दैनंदिन प्रपंच, व्यवहार आणि सार्वजनिक जीवनातील विविध प्रसंगातील विनोदांची अतिशय अप्रतिम मांडणी त्यांनी केली. सत्काराला उत्तर देताना बण्डा जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सचिन ईटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी महोत्सवाविषयी आणि कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×