बीडच्या अंबाजोगाईतील राडीत धाडसी चोरी

बीडच्या अंबाजोगाईतील राडीत धाडसी चोरी

तब्बल पावणे सात लाखांचा ऐवज लंपास

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यात दिवसेंदिवस चोऱ्याचे प्रमाण वाढत असून मागील काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे . दरदिवशी चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चोऱ्या रोखण्यासाठी काही उपाय योजना केल्या पाहिजेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरेगांव पार्कमध्ये घरफोडी; १४ लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी 

अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे घरामध्ये घुसून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व नगदी रक्कम असा ६ लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे बालासाहेब विष्णू गंगणे (रा. राडी ता. अंबाजोगाई) यांच्या घराचे दार उघडून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील सोन्या चांदीचे दागिने ५ लाख २३ हजार रूपये, रोख दिड लाख रूपये असा ६ लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास केला. घरात चोरी झाल्याचे गंगणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×