पुण्यात वेश्या व्यवसायाचा पर्दापाश; दोघींची सुटका

पुण्यात वेश्या व्यवसायाचा पर्दापाश; दोघींची सुटका

सरस्वतीनगरातील योगिराज कॉम्पेक्समध्ये छापा टाकून वेश्या व्यवसायाचा केला पर्दापाश

marathinews24.com

पुणे – पैशांचे आमिष दाखवून मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याची घटना उत्तमनगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने सरस्वतीनगरातील योगिराज कॉम्पेक्समध्ये छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दापाश केला. त्याठिकाणाहून दोन मुलींची सुटका करीत एका आरोपी महिलेला अटक केली आहे. गौरी विकास पवळे (वय ४५ रा. बधे कॉम्पलेक्स, उत्तमनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

बीडच्या अंबाजोगाईतील राडीत धाडसी चोरी – सविस्तर बातमी 

उत्तमनगरातील योगिराज कॉम्पलेक्समध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ४ फेबु्रवारीला घटनास्थळी धाव घेतली. त्या इमारतीवर छापा टाकून दोन मुलींची सुटका केली. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही. कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×