Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

‘व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026’ची घोषणा

‘व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026’ची घोषणा

लीगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिन वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

marathinews24.com

पुणे – भारतातील पहिली डॉक्टर-सेलिब्रिटी टी-20 लेदर बॉल क्रिकेट लीग असलेल्या व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग (WCCL) 2026 ची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. “जिथे आरोग्यसेवा, क्रिकेट आणि ग्लॅमर एकत्र येतात” या संकल्पनेवर आधारित ही अनोखी लीग डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सन्मान देतानाच दर्जेदार क्रिकेट मनोरंजन देणार आहे अशी माहिती या लीगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिन वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -२०२६ – सविस्तर बातमी 

यावेळी सीए अखिल कुमार, दीपेश शेरे (WCCL ऑपरेशन्स आणि मार्केटिंग ) उपस्थित होते.

पुढे बोलताना सचिन वाघमारे म्हणाले, ही भारतातील पहिली अशी लीग आहे, जिथे देशभरातील डॉक्टर आणि नामवंत सेलिब्रिटी एकाच व्यासपीठावर खेळताना दिसतील. WCCL ट्रायल्सला देशभरातून 5,000 हून अधिक डॉक्टरांनी नोंदणी केली असून, भारतात प्रथमच आयोजित होत असलेल्या डॉक्टरांच्या व्यावसायिक क्रिकेट लीगसाठी देशभरात ग्राउंड ट्रायल्स पूर्ण झाल्या असून निवड प्रक्रिया सुरू आहे. पुणे, मुंबई, अहमदाबादसह विविध शहरांमध्ये मोठ्या उत्साहात चाचण्या घेतल्या जात आहेत.

या लीगमध्ये 10 डॉक्टर-नेतृत्वाखालील संघ असतील. प्रत्येक संघात 1 ते 2 सेलिब्रिटी खेळाडू सहभागी होतील. पुण्यात राऊंड-रॉबिन पद्धतीने लीग सामने खेळवले जातील, तर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना देशाच्या बाहेर होणार आहे. 200 ते 500 निवडक डॉक्टरांचा भव्य लिलाव (ग्रँड ऑक्शन) पुण्यात पार पडणार असून तो थेट प्रक्षेपित केला जाईल. या लीगमध्ये केवळ भारतीय डॉक्टरच नव्हे तर यूकेसह परदेशातील डॉक्टरही सहभागी होत आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण व खेडेगावातील डॉक्टर-खेळाडूंनी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. तसेच लीगमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, संजय जाधव, प्रवीण तरडे यांसह अनेक नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत.

‘व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026’ची प्राथमिक फेरी 4 ते 8 मे 2026 दरम्यान दोन गटात साखळी सामन्याने होणार आहे. हे सामने पुण्यात तर सेमी फायनल आणि फायनल सामने दुबई येथे खेळविण्यात येणार आहेत. डॉक्टर्सना त्यांच्या वैद्यकीय सेवेपलीकडे जाऊन वेगळ्या स्वरूपात सन्मान या लीग च्या माध्यमातून होणार आहे. डॉक्टर खेळाडू इतर कोणत्याही IPL क्रिकेटपटूपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या कौशल्य, शिस्त आणि जिद्दीमुळे ही लीग देशातील क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले.

सध्या मुंबई मेडस्टार्स, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, पंजाब, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि कोलकाता या शहरांच्या नावाने संघ तयार करण्यात येत आहेत. काही संघांच्या स्लॉट्स अद्याप खुले असून, इच्छुक गुंतवणूकदार व संघमालकांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×