Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

घैसास यांनी विद्यार्थ्यांना दिले यशस्वी उद्योजक होण्याचे मंत्र

marathinews24.com

पुणे – शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २६ वा पदविका प्रदान समारंभ आज आयोजित करण्यात आला. यावेळी जेनकोव्हल समुहाचे चेअरमेन, दीपक घैसास तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, नियामक मंडळ सदस्य मिलींद धोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मोहन धारिया यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारीला ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ – सविस्तर बातमी 

या समारंभात स्थापत्य, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचार, यंत्र, धातुशास्र, संगणक माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझायनिंग ॲड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या अभियांत्रिकी विद्याशाखेतील सर्व स्नातकांना पदविका प्रदान करण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विदयार्थ्यांपैकी शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम क्रमांक व व्दितीय क्रमांक मिळविणाऱ्या विदयार्थ्यांना मानचिन्हे आणि पारितोषिके देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

घैसास म्हणाले, यशस्वी उद्योजक होण्याकरीता कार्यक्षेत्राचे ज्ञान, सकारात्मक मनोवृत्ती, उद्योगाबद्दलचा अभिमान, विश्वास या मूल्यांची गुरुकिल्ली दिली. त्याचप्रमाणे मराठी भाषेचे महत्व विशद करुन, देश व समाजसेवा करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. डॉ. नितीन कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच डॉ. शिरिष धोबे यांनी आभार प्रदर्शन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×