Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महापालिका भवन परिसरात थांबलेल्या तरुणाकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण धायरी भागात राहायला आहे. १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तरुण महापालिका भवन परिसरात थांबला होता. धायरीकडे जाण्यासाठी त्याने ॲपचा वापर करून मोटार नोंंदणी केली. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या हातातील ६० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. पोलीस कर्मचारी अशोक धावडे तपास करत आहेत.

बिबवेवाडीत फ्लॅटचे कुलूप तोडून साडेदहा लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी 

येरवड्यातील कल्याणीनगर परिसरात एकाकडील एक लाख रुपयांचा मोबाइल हिसकावून नेण्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मूळचा दिल्लीचा आहे. १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तरुण कल्याणीनगर भागात थांबला होता. दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाकडील मोबाइल हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे तपास करत आहेत.

एसटी प्रवासी महिलेचा ऐवज चोरी

प्रवासी महिलेकडील ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७२ वर्षीय महिला सांगली जिल्ह्यातील कवलापूर गावच्या रहिवासी आहे. त्या सांगली ते स्वारगेट दरम्यान एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून १५०० रुपये, सोन्याचे दागिने, मोबाइल संच, कागदपत्रे असा ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. पोलीस कर्मचारी फरांदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×