Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात बसमध्ये महिलांचे दागिने चोरणारे सराईत अटकेत

पुण्यात बसमध्ये महिलांचे दागिने चोरणारे सराईत अटकेत

२ लाखांचे दागिने जप्त, सहकारनगर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात महिलांचे दागिने चोरणार्‍या दोन सराईतांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख २ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गोविंद विठ्ठल गायकवाड (वय ३९ रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा) वैभव शैलेश गायकवाड (वय २८ रा. केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बसप्रवासात महिलांचे दागिने चोरणारे सराईत असून, ते सध्या एका गुन्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी कारागृहातून दोघांना ताब्यात घेतले.

शिवाजीनगर भागात ज्येष्ठाला धमकावून लुटले – सविस्तर बातमी 

चौकशीत आरोपींनीनगुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दोन लाखांचे दागिने जप्त केले आहेत. आरोपी गोविंद गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्नचे तीन, मारामारी, चोरीचे नउ असे मिळून १३ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी वैभव गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्नासह मिळून चार गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलींद मोहीते, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, बापु खुटवड, अमोल पवार, निलेश शिवतरे, बजरंग पवार, किरण कांबळे, सुतकर, अभिमान बागलाने, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×