Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शादी डॉट कॉमवरील ओळख पडली महागात

महिलेची ६० लाखांची फसवणूक

marathinees24.com

पुणे – महिलेला शादी डॉट कॉम या वेबसाईटवरील ओळख चांगलीच महागात पडली असून, लग्नाची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तिला तब्बल ६० लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ कालावधीत वडगावशेरीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भांडणातून कुटूंबियाला मारहाण, घराचेही केले नुकसान – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव शेरीत राहायला असून, नोव्हेंबर २०२४ मध्ये शादी डॉट कॉम वेबसाईटवर तिची आरोपीची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर आरोपीने महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने इतर आरोपींच्या मदतीने तक्रारदार महिलेला विविध कारणे सांगून तिच्याकडून वेळोवेळी रक्कम ऑनलाईनरित्या वर्ग करून घेतली. तब्बल ६० लाख रूपये घेतल्यानंतरही तक्रारदारासोबत आरोपीने लग्न केले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×