Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

हाॅटेल आरक्षणाच्या नावाखाली महिलेची ७ लाखांची फसवणूक

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हाॅटेलमधील खोली आरक्षित करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका महिलेची ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५३ वर्षीय महिला शिवाजीनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नामांकित ऑनलाइन बुकिंग सुविधा देणाऱ्या संस्थेतून बोलत असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी महिलेकडे केली. नाशिकमध्ये आरक्षित केलेल्या हाॅटेलमधील आरक्षणाची तारीख बदलतो, अशी बतावणी चोरट्यांनी महिलेकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर व्हिडीओ काॅलिंग सुविधेचा वापर करुन संपर्क साधला.

चोरट्यांनी मोबाइल क्रमांक, तसेच अन्य बाबींची माहिती घेतली. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला होता. चोरट्यांनी मोबाइल क्रमांक ‘हॅक’ करुन महिलेच्या बँक खात्यातून परस्पर सात लाख २३ हजार रुपये स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. फसवणूक झाल्या्चे उघडकीस आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत

क्रेडीट कार्डच्या आमिषाने २ लाखाची फसवणूक

क्रेडिट कार्ड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची दोन लाख १६ हजार ३९३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी त्यांना एका नामांकित बँकेचे क्रेडीट कार्ड देण्याच्या आमिष दाखविले. चोरट्यांनी त्यांना एक लिंक उघडण्यास सांगितले. लिंक उघडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख १६ हजार रुपये लांबवले.

गुंतवणुकीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चाेरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकव एक लिक पाठविली. गुंतवणुकीवर जादा परव्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी तीन लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×