Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

स्वतःचे कटींगचे दुकान सुरु केल्याने तरूणाचा केला खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना केली अटक

marathinews24.com

पुणे – कटींग दुकानात काम केल्‍यानंतर गावाला जातो सांगत स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार बिबबवेवाडी येथे घडला. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत.

वाढदिवसाला तलवारीने केक कापणे अंगलट – सविस्तर बातमी

मोहमद्द शमी (वय २५, अप्पर जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्‍तरप्रदेश) असे खुन झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्‍मद सलमान फिरोज कुरेशी ( वय १८, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी, पुणे) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्‍मद कुरेशी हा मोहम्‍मद शमी याचा भाऊ आहे. दोघेही मुळचे प्रयागराज येथील राहणारे आहेत. आरोपी सौरभ चोरगे याच्‍या कटींगच्या सलूनमध्ये मोहम्‍मद शमी हा गेल्‍या दोन वर्षापासून कामाला होता. काही दिवसांपूर्वी शमीने मालकाला गावाला जातो सांगितले. परंतु गावाला न जाता त्‍याने स्वतःचे कटींग सलूनचे दुकान सुरू केले. मात्र शमी हा चोरगेकडील ग्राहक स्वतःच्‍या दुकानात बोलवू लागला. याची खबर चोरगेला लागली. याचाच राग मनात धरून तो मित्रांसह शमीला जाब विचारण्यासाठी त्‍याच्‍याकडे गेला. तेथे त्‍याच्‍यात वाद झाले. यात तिघांनी शमीला लाथा बुक्‍क्‍यांनी जोरदार मारहाण केली. यातच शमीचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्‍हा दाखल केला असून तिघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×