कोंढव्यात अल्पवयीनाला हाॅकी स्टिकने मारहाण

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी

पोलिसांकडून दोघांना अटक

marathinews24.com

पुणे – एकमेकांकडे बघण्याच्या वादातून अल्पवयीनाला हाॅकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढव्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आसिफ हिदायत शेख (वय २४, रा. टेम्पल टाॅवर सोसायटीसमोर, कोंढवा), आवेज इलियास शेख (वय २४, रा. निलेश काॅम्प्लेक्स, मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीनाने काेंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाह समारंभात ज्येष्ठाकडील दीड लाखाांची सोनसाखळी चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन हा २० फेब्रुवारी राेजी रात्री साडेदहाच्या सुमारास मित्राबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी शेख आणि अल्पवयीन मुलाने एकमेकांकडे बघितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपी शेख आणि साथीदारांनी मुलाला शिवीगाळ करुन हाॅकी स्टिकने बेदम मारहाण केली. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×