लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांचे मोबाइल चोरणार्या सराईताला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ३५ मोबाइल जप्त केले आहेत. विष्णू रतनलाल मावर (वय २५, रा. माधोपूर, राजस्थान, सध्या ससून रूग्णालयाजवळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार कादिर शेख आणि अतुल जाधव यांना येरवड्यातील शादलबाबा चौकात एकजण चोरीचे मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
गाडीतळ पोलीस चौकीत शिपायाला धक्काबुक्की – सविस्तर बातमी
एपीआय रविकांत नंदनवार यांनी पथकासह जाउन त्याठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी विष्णू मावर याला ताब्यात घेत, मोबाइल जप्त केला.चौकशीत त्याने ३४ मोबाइल चोरल्याची कबुली दिली. संबंधित मोबाइल जप्त केले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी सुनील जैतापुरकर, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अमोल गायकवाड सुरज ओंबासे यांनी केली.






















