Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

लोणी काळभोरमध्ये मद्यपीकडून रुग्णालयात तोडफोड

लोणी काळभोरमध्ये मद्यपीकडून रुग्णालयात तोडफोड

डाॅक्टरांना धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा

marathinews24.com

पुणे – मद्यपी तरुणाकडून डाॅक्टरांना धक्काबुक्की करुन रुग्णालयात तोडफोड करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी मद्यपी तरुणाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संतोष रमेश गुंजाळ (वय ३५, रा. काकडे वस्ती, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डाॅक्टरांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाहनाच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टरांचा पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा येथे रुग्णालय आहे. आरोपी गुंजाळ हा बुधवारी (१८ मार्च) दुपारी पावणेएकच्या सुमारास रुग्णालयात आला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. डाॅक्टरांनी मलमपट्टी केली. वैद्यकीय उपचाराचे त्यांनी पैसे मागितले. तेव्हा गुंजाळने पैसे देण्यास नकार देऊन डाॅक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रुग्णालयात त्याने गोंधळ घातला. त्यानंतर त्याने रुग्णालयातील काच फोडली. काचेचा तुकडा रुग्णाच्या हाताला लागल्याने जखम झाली. डाॅक्टरांना दगड फेकून मारला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×