Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

२० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून

२० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संपन्न

marathinews24.com

पुणे – भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अजरामर नाव असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ येत्या २०, २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संपन्न होणार आहे.

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची आरास – सविस्तर बातमी 

तारंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील नामवंत तसेच युवा कलाकार आपली कला सादर करणार असून, शास्त्रीय गायन, वादन, नाट्यसंगीत आणि नृत्य यांचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :
२० मार्च रोजी सायंकाळी  ‘स्वराभिषेक’ या संकल्पनेतून नाट्यभाव भक्ती संगीताची विशेष मैफल सादर होणार आहे. यामध्ये राजयोग धुरी, विश्वजित मैत्रेयी, अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

२१ मार्च रोजी सकाळी ९ वा. च्या सत्रात शर्वरी दिघेकर-फोकळे यांचे गायन, पार्थ भुमकर व प्रथ्मेश तारळकर यांचे जुगलबंदी सादरीकरण आणि श्रुती ढोकळकर यांचे गायन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता  पं. राम शंकर, डॉ. राजा काळे आणि पद्मविभूषण डॉ. एन. राजम (व्हायोलिन) यांचे सादरीकरण रंगणार आहे.

२२ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सत्रात निवेद व्यास, अनुपम जोशी (सरगम) आणि जयंत केजकर यांचे गायन होणार आहे. सायंकाळच्या सत्रात नयनिका घोष यांचे कथक नृत्य, पं. सतीश व्यास यांचे संतूर वादन आणि विदुषी डॉ. श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’  मध्ये रसिकांना प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×