Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

Pune Crime : बालविवाह रोखल्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघड

Pune Crime

पोलिसांकडून तरुणाला अटक

marathinews24.com

पुणे – Pune Crime : बाल विवाह रोखल्यानंतर सासुरवाडीकडील मंडळी अल्पवयीन युवतीला पुन्हा सासरी घेऊन गेले. त्यानंतर युवती अल्पवयीन असल्याची माहिती असताना तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. युवतीने याबाबत पोलिसंकडे तक्रार दिल्यानंतर बाणेर पोलिसांनी एकाला अटक केली.

नांदण्यास नकार दिल्याने पत्नीची दुचाकी जाळली – सविस्तर बातमी 

तक्रारदार युवतीचा विवाह एका तरुणाशी निश्चित करण्यात आला होता. युवती अल्पवयीन असल्याची माहिती सासरकडील मंडळींना होती. अल्पवयीन युवतीचा विवाह करण्यात येत असल्याची माहिती ‘चाईल्ड हेल्पलाइन’ या स्वयंसेवी संस्थेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने विवाह रोखण्यात आला. नोव्हेंबर २०२५ मध्ये तरुणाच्या वडिलांनी युवतीला सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील घरी नेले. लोणंद येथे दोन महिने युवती राहिली. दरम्यान, बालविवाह रोखल्यानंतर युवतीला सासरकडील मंडळींनी पुन्हा नांदण्यास नेले असल्याची माहिती ‘चाईल्ड हेल्पलाईन‘ला मिळाली. स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्त्यांनी तिची तेथून सुटका केली. त्यानंतर युवतीची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत युवतीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

युवती अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर युवतीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) २२ वर्षीय तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×