Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याची बतावणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याची बतावणी

तोतयागिरी करणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

marathinews24.com

पुणे – सॉफ्टवेअर फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देऊन स्वत:ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) असल्याचे भासवून तोतयागिरी करणाऱ्यावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय ४७, रा. लिजंट सोसायटी, हिंजवडी) असे गुन्हा दाखल केलेल्या तोतयाचे नाव आहे. ही घटना परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या कार्यालयात १ एप्रिलला दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एसटीत प्रवेश करताना जेष्ठेचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी सांगितले, समर्थ पोलिस ठाण्यात सॉफ्टवेअरबाबत फसवणुकीचा गुन्हा २०२१ मध्ये दाखल करण्यात आला होता. हा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित असून, यातील तक्रारदार अगरवाल यांच्या मित्राच्या माध्यमातून प्रद्युम्न पाटील याची ओळख झाली होती. त्याने अगरवाल यांना आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचे सांगितले. तुम्हाला पोलिसांच्या मदतीने कोर्टाबाहेर नुकसान भरपाई मिळवून देतो. १० टक्के मला द्यावे लागतील, असे सांगितले होते.

प्रद्युम्न पाटील हा बुधवारी दुपारी साडेचार वाजता पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या कार्यालयात आला. त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचे सांगितले. थेट उपमुख्यमंत्री यांचा ओएसडी आल्याचे पाहून पोलिस गडबडून गेले. त्याने उपायुक्त रावले यांची भेट घेतली. समर्थ पोलिस ठाण्यातील केसमध्ये पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही. मी अनेकदा मेसेज केले, मात्र त्याला उत्तर दिले नाही, असे तो सांगू लागला. त्यामुळे रावले यांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे रावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात चौकशी केली असता, त्यात असा कोणी माणूस ओएसडी नसल्याचे सांगण्यात आले.

पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी चौकशी केल्यावर त्याची तोतयागिरी उघड झाली. त्यानंतर त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला नोटीस देऊन, चौकशीसाठी बोलवले होते. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×