Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

मनी लॉड्रींगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

Sahakarnagar gang terror

जेष्ठेला ९ लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – मनी लॉड्रींगच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देउन सायबर चोरट्यांनी एका जेष्ठ महिलेला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३१ मार्च ते २ एप्रिल कालावधीत कोंढवा खुर्दमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे महानगरपालिका भवनात महिला उपायुक्तांना शिवीगाळ –  सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला कोंढवा खुर्द भागात राहायला असून, ३१ मार्चला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. पोलीस असल्याची बतावणी करीत दहशतवाद्यांच्या यादीत महिलेचे नाव असल्याचे सांगितले. तसेच मनी लॉड्रींगच्या नावाखाली अटक करण्याची भीती दाखवून तब्बल ९ लाख रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.

शेअरमध्ये गुंतवणूूकीच्या आमिषाने फसवणूक

शेअरमार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला ९ लाख ४१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १० ते ३० ऑक्टोबर २०२५ कालावधीत मांजरी रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×