Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर पादचाऱ्याचा मृत्यू

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा पीएमपीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुुरुवारी रात्री स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी रात्री उशीरा पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्या प्रतिष्ठानच्या स्कुलला क्लार्कने घातला ३७ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

कात्रजहून स्वारगेटकडे निघालेली पीएमपी बस स्वारगेट मेट्रो स्थानकासमोरुन निघाली होती. त्या वेळी पादचारी रस्ता ओलांडता होता. पीएमपीच्या चाकाखाली पादचारी सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी पीएमपी चालकाला ताब्यात घेतले. चैाकशीत पादचारी रस्ता ओलांडत असातना पळत होता. अचानाक पीएमपी बसच्या मागच्या चाकाखाली तो सापडला, अशी माहिती पीएमपी चालकाने पोलिसांना दिली.
पोलिसांनी स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. स्वारगेट भाग गजबलेला असतो. स्वारगेट परिसरात पीएमपी, मेट्रो, तसेच एसटी स्थानक आहे. याभागात प्रवाशांची मोठी गर्दी असते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×