Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने गंडा

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने साबयर चोरट्यांनी ५७ वर्षीय नागरिकाला तब्बल १९ लाख ५५ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना १० नोव्हेंबर ते ९ फेबु्रवारी २०२६ कालावधीत लोहगामवध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोहगावमध्ये राहायला असून, १० नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. तब्बल १९ लाख ५५ हजार रूपये गुंतवल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील तपास करीत आहेत.

अतिक्रमणविरोधी पथकाला शिवीगाळ, गुन्हा दाखल

अतिक्रमणविरोधी पथकाला शिवीगाळ करीत धमकी दिल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ एप्रिलला स्वामी विवेकानंद चौक ते सुतार दवाखाना कोथरूड परिसरात घडली आहे. याप्रकरणी पथकातील एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुणे महानगरपालिकेच्या अमिक्रमण विरोधी पथकात कार्यरत असून, ८ एप्रिलला ते कोथरूडमध्ये कारवाई करीत होते. त्यावेळी एकाने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×