Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश

वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याच्यादृष्टीने वाहतूक बदलाचे आदेश

marathinews24.com

पुणे – वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याच्यादृष्टीने पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी पुणे शहरातील विविध वाहतूक विभागांतर्गत वाहतूक बदलाचे आदेश जारी केले आहे. कोंढवा वाहतूक विभागांतर्गत मंतरवाडी चौकाकडून येऊन होले वस्तीकडे जाणाऱ्या वाहनांनी उंड्री चौकातुन सरळ पुढे ६५ मीटर जाऊन यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे असे नमूद करण्यात आले आहे.

स्थानिकांना रोजगार देण्याबाबत प्रपत्र सादर करण्याचे उद्योगांना आवाहन – सविस्तर बातमी 

वडाची वाडी गावाकडुन येऊन होले वस्ती कडे जाणाऱ्या वाहनांनी उंड्री चौकात डावीकडे वळण घेऊन पुढे ६५ मीटर जाऊन यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे. एन.आय.बी.एम. व होले वस्ती चौकाकडून येऊन खडी मशीन चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी उंड्री चीकात डावीकडे वळून २५ मीटर पुढे जाऊन यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे. खडी मशीन चौकाकडून येऊन वडाची वाडी गावाकडे जाणाऱ्या वाहनांनी उंड्री चौकातून सरळ पुढे २५ मीटर जाऊन यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

येरवडा वाहतूक विभागांतर्गत शादलबाबा चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळून चंद्रमा चौकाकडे जाण्यासाठी असलेला सिग्नल हा बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी सदर वाहनांनी डॉ. बाबासाहेच आंबेडकर चौकातून आंळदी रोड जक्शन मार्गे इच्छित स्थळी जावे. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त जाधव यांनी कले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×