Breking News
पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा- व्ही. राधा

पुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा- व्ही. राधा

स्टार्टअप, आयटी व उद्योग गुंतवणुकीला चालना देणाऱ्या आराखड्याला वेग

marathinews24.com

पुणे – नीती आयोग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पुणे ग्रोथ हब आराखड्याचा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे गुरुवारी आढावा घेतला. संबंधित विभागांनी वारंवार बैठका घेऊन समन्वयाने अंतिम आराखडा सादर करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन – सविस्तर बातमी 

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी, सल्लाकार कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते.

पुणे ग्रोथ हबमुळे स्टार्टअप, आयटी आणि उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ग्रोथ हब प्रकल्पांचे पुणे आर्थिक क्षेत्रासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन लक्षात घेऊन सर्वसमावेशक नियोजन करावे. प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांशी विभागनिहाय सविस्तर बैठका आयोजित करुन प्रत्येक विभागाचा भविष्यातील दृष्टीकोन, गरजा व प्राधान्यक्रम समजून घेऊन या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. करीर यांनी दिल्या.

यावेळी प्रकल्पांची एकूण प्रगती व पूर्ण झालेले टप्पे, आर्थिक व जीवनमान निर्देशांकांची निर्मिती, उत्पादन, पायाभूत सुविधा, संपर्क व नागरी विकास या क्षेत्रांवरील सखोल अभ्यास व अंमलबजावणीचा दृष्टीकोन, आर्थिक, जीवनमान, शाश्वतता व समावेशकता यांवर आधारित डेटा-आधारित नियोजन, ११ क्षेत्रांमध्ये ५० हून अधिक शासकीय बैठक व ८० हून अधिक खाजगी क्षेत्र संवादाद्वारे व्यापक सल्लामसलत, प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रकल्पांची ओळख, शासन-खाजगी भागीदारी व गुंतवणूक नियोजनावर भर आणि एकात्मिक प्रादेशिक नियोजनावर विशेष लक्ष याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×