अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले
marathinews24.com
पुणे – शहरातील रामवाडीतील सैनिकरोड परिसरातील पत्र्याच्या गोदाम वजा दोन दुकानांना शुक्रवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची अग्निशमन दलाला मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. पत्र्याच्या गाळ्यांमुळे आतमध्ये पोहोचणे अवघड होत असल्याने जवानांनी लोखंडी पत्र्याचे अँगल वाकवून आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवले.
मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? – सविस्तर बातमी
गाळ्यांमध्ये चप्पल-बुटांचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आला होता. आगीमुळे दुकानातील मालाचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुमारे अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले, तर ४५ मिनिटांत आग पूर्णपणे विझवण्यात आली.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.





















