मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार ?

मस्साजोग ग्रामपंचायतची पोटनिवडणूक काही तासांवर; उमेदवारांकडून प्रचाराला वेग

सरपंच पदाच्या निवडणुकीत देशमुख विरुद्ध देशमुख रंगणार सामना

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेलेल्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, हे चित्र स्पष्ट झाले आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज ध्यान्यात घेऊन बहृत आराखडा तयार करा – सविस्तर बातमी

पोटनिवडणूक लढवण्यासाठी गावातील गटातटातील पाच इच्छुक उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, या शेवटच्या दिवशी पाच इच्छुक उमेदवाराकडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारापैकी तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता फक्त दोन उमेदवारमध्ये निवडणूकीची चुरस पाहायला मिळणार आहे. या लढतीत देशमुख विरुद्ध देशमुख असा सामना रंगणार आहे . त्यामुळे संपूर्ण राज्याचे मस्साजोगच्या पोटनिवडणुकीकडे लक्ष केंद्रित होणार आहे.

पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी सरपंच पदासाठी लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर चिन्हाचे वाटप आज करण्यात आले. त्यामुळे, गेल्या आठवडाभरापासून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधलेल्या मस्साजोग सरपंचपदाची निवडणूक होणार असल्याचे चित्र निश्चित झाले असून देशमुख विरुद्ध देशमुख असाच सामना रंगणार आहे. यामध्ये कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मस्साजोगच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला त्यामध्ये जिवनी देशमुख, पंजाबराजे देशमुख आणि स्वरुपानंद देशमुख यांच्या पत्नी करुणा देशमुख या तीन उमेदवारांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

मागील सरपंचपदाच्या निवडणुकीत ९ मतांनी पराभूत झालेल्या आणि अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी पासून ते अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज ठाम भूमिका बजावत मी हि पोटनिवडणूक लढवणारच , असे म्हणत कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या पोटनिवडणुकीसाठी २८ तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्या दिवशी २९ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे.आता, मस्साजोगचा सरपंच पदासाठी वर्णी कोणाची लागणार आणि गावचा बाजीगर कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मागे घेतलेले अर्ज –

मस्साजोगच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुक झाली होती त्यानंतर, ७ एप्रिल पासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती, त्यामध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख, यांच्या सह पाच इच्छुक उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यात आले होते.दि.१७ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, अर्ज प्रक्रियेत सहभागी झालेल्या पाच उमेदवारांपैकी तीन इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागे घेण्यात आला आहे . त्यामध्ये पंजाबराव देशमुख, संजीवनी देशमुख, करुणा देशमुख यांचा समावेश आहे.तर स्वरूपानंद देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक लढवण्यासाठी ठामपणे निर्णय घेतला आहे.

देशमुख विरुद्ध देशमुख रंगणार सामना

मस्साजोगच्या सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक हि आता दोन गटात होणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचे मस्साजोगच्या पोटनिवडणुकीकडे लक्ष वेधले जाणार आहे.आता पोटनिवडणुक हि देशमुख विरुद्ध देशमुख असा सामना रंगणार आहे. एकीकडे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या लढतीत उतरल्या आहेत तर दुसरीकडे गेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या नऊ मतांनी पराभव झालेले स्वरूपानंद देशमुख हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तरी या निवडणुकीमध्ये कोणाला गुलाल लागणार? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अनेक पुढार्यांची दिवंगत देशमुखांच्या पत्नी यांना निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न 

गावामध्ये गटागटांचे राजकारण असल्यामुळे राज्यातील व बीड जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांकडून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी गावकऱ्यांची संपर्क साधून या पोटनिवडणुकीत निवडून आणण्यासाठीचे शर्यतीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत संबंधित उमेदवाराला या निवडणुकीचं पारडं जड पडणार आहे. त्यामुळे या निवडणूकीत दोन गटात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे गुलाल कोणाला लागणार ?हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×