Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

तळजाई वसाहतीत दुचाकींची तोडफोड करणारा अटकेत

तळजाई वसाहतीत दुचाकींची तोडफोड करणारा अटकेत

हकारनगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील पद्मावती भागातील तळजाई वसाहतीत दहशत माजवून तोडफोड करणाऱ्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. साहिल उर्फ भावड्या संतोष कुचेकर (वय २५, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत संजय वसंत खंदारे (वय ४२, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहकारनगर भागात तरुणाला धमकावून लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१७ एप्रिल) मध्यरात्री दीडच्या सुमारास कुचेकर हा तळजाई वसाहत परिसरात आला. ‘मी तळजाई वसाहतीतील भाई आहे. माझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याला जिवे मारू’, अशी धमकी त्याने रहिवाशांना दिली. त्यानंतर त्याने वसाहतीतील दुचाकींची दांडक्याने तोडफोड करून दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश मोरे, उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे तपास करत आहेत. यापूर्वी तळजाई वसाहत दहशत माजविण्यासाठी सराईतांनी वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी सराइतांनी तळजाई वसाहतीतील २५ हून जास्त वाहनांची तोडफोड केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×