Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

अक्षय तृतीया व आंबा महोत्सवानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल

अक्षय तृतीया व आंबा महोत्सवानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल

दगडूशेठ गणपती परिसरात विशेष नियोजन; सकाळपासून वाहतूक वळवण्यात येणार

marathinews24.com

पुणे – अक्षय तृतीया आणि आंबा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गर्दी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १९) सकाळी सात वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत शिवाजी रोड, लक्ष्मी रोड आणि आसपासच्या भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

“बुद्धिमत्तेसोबत कठोर परिश्रमही यशासाठी तितकेच आवश्यक” : सनी निम्हण – सविस्तर बातमी

अत्यावश्यक सेवा वगळता पीएमपी बस, चारचाकी तसेच जड वाहनांची वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर बंदी घालण्यात येणार असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यातील वाहतूक बदल

– शिवाजी रोडवरून स्वारगेटकडे जाणारी बस वाहतूक स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडमार्गे वळवण्यात येईल.

– पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या बसेस जंगली महाराज रोड–झाशी राणी चौकमार्गे जातील.

– आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील; ही वाहतूक बाजीराव रोडमार्गे वळवली जाईल.

– गणेश रोडकडे जाणाऱ्या काही बस मार्गांतही बदल करण्यात आले असून पर्यायी अंतर्गत मार्गांचा वापर केला जाईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×