Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

वॅलेंटीना इंडस्ट्रीजवर आर्थिक गुन्‍हे शाखेची छापेमारी

पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत

अलंकार पोलिस ठाण्यात हजारोंची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महिन्याला १ ते ५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून सामान्य नागरिकांसह अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी वॅलेंटीना इंडस्ट्रीजच्या दोन जणांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यालयावर तसेच निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेकडून छापेमारी करत झाडाझडती घेण्यात आली. यावेळी चौकशी महत्‍वाची कादपत्रे जप्‍त करण्यात आली आहे. याप्रकरणी वॅलेंटीना इंडस्ट्रीजचे संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अलंकार पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर मालवाहू टेम्पोला आग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॅलेंटीना इंडस्ट्रीजचे कार्यालय कर्वे रोड परिसरातील सक्सेस स्क्वेअर इमारतीत आहे. आरोपींपैकी एक जण सॅलिसबरी पार्क तर दुसरा बिबवेवाडी परिसरात राहतो. आरोपींनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध गुंतवणूक योजना तयार केल्या होत्या. या योजनांमध्ये कागदोपत्री १ टक्का, तर प्रत्यक्षात ५ टक्के परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवण्यात आले होते. गुंतवणूकदारांना प्रलोभन देऊन आरोपींनी तब्बल ४३ कोटी २० लाख रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा व मुद्दल देणे बंद केल्याने काहींनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. हा सर्व प्रकार जुलै २०२२ ते एप्रिल २०२६ या कालावधीत घडला. या प्रकरणी शासनातर्फे अनियमित (अनधिकृत) ठेवी योजना बंदी कायदा, २०१९ च्या कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर बांदल व चोरगे यांच्या कार्यालयावर व राहत्या घरी झाडाझडती घेण्यात आली. प्राथमिक चौकशीत किमान दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे.

विवेक मासाळ, पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×