Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

वाघोली परिसरात संगणक अभियंता महिलेसह दोघींची आत्महत्या

वाघोली परिसरात संगणक अभियंता महिलेसह दोघींची आत्महत्या

छळामुळे आत्महत्या केल्याचे उघड; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील वाघोली परिसरात वेगवेगळ्या घटनेत छळामुळे संगणक अभियंता महिलेसह दोघींनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आले. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. संगणक अभियंता महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन तिच्या पतीला अटक करण्यात आली. वाघोली परिसरात एका ३७ वर्षीय संगणक अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तिच्या भावाने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी पती अभिषेक गुप्ता (वय ३१) याला अटक करण्यात आली. संगणक अभियंता महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन सासू, सासरे, नणंद याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले आरोपी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहेत.

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

आराेपीने संगणक अभियंता महिलेकडे दहा लाख रुपये हुंड्याची मागणी केली हाेती. मागणी पूर्ण न केल्याने तिचा शारिरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. छळामुळे तिने वाघोलीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे संगणक अभियंता महिलेच्या भावाने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.

वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात एका २१ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी पती, सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिक्षा जयसिंग कदम (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरणीचे नाव आहे. या प्रकरणी पती जयसिं मधुकर कदम (वय २९),याला अटक करण्यात आली. या प्रकरणी सासू हौसाबाई (वय ५५) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पतीने माहेरहून सोन्याची अंगठी आणण्याची मागणी केली होती. मोटारीची हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करुन तिचा छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×