Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

नोकरानेच मारला डल्ला, ७ लाखांचा ऐवज चोरला

ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडी

वानवडीतील फातिमानगरातील मनीष दर्शन सोसायटीत घडली घटना

marathinews24.com

पुणे – घरकाम करणार्‍या नोकराने मालकाची नजर चुकवून साडेचार लाखांचे दागिने आणि रोकड असा मिळून ७ लाख ५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ८ मार्च ते ९ एप्रिल २०२६ कालावधीत वानवडीतील फातिमानगरातील मनीष दर्शन सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

महिलेला कमी गुंतवणूकीवरील नफा पडला ५२ लाखांना – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला फातिमानगरातील मनीष दर्शन सोसायटीत राहायला असून, मागील काही महिन्यांपासून त्यांच्या घरात काम करण्यासाठी नोकर कार्यरत होता. ८ मार्च ते ९ एप्रिल कालावधीत त्याने महिलेची नजर चुकवून घरातील साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा ७ लाख ५ हजारांचा ऐवज चोरून नेला. तो कामावर येत नसल्यामुळे महिलेला संशय आल्यानंतर त्यांनी ऐवजाची तपासणी केली. त्यावेळी दागिन्यांसह रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

गुंतवणूकीच्या आमिषाने तरूणाची २२ लाखांची फसवणूक

जडेजा ब्रदर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांना पैसे पाठवण्यास भाग पाडून तब्बल २१ लाख ७१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना १५ जून २०२५ ते ३ फेब्रुवारी २०२६ कालावधीत डेक्कन परिसरात घडली. याप्रकरणी तरूणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×