Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

वारजे भागात सोसायटीतील दुकानात आग

अग्निशमन दलाकडून अर्ध्या तासात आग आटोक्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील वारजे भागातील एका सोसायटीत असलेल्या स्टेशनरी साहित्याच्या दुकानात मध्यरात्री मोठी आग लागली. अग्निशमन दलाकडून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सोसायटीतील दुकानात आग लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट उडाली.

कात्रज घाटात एसटी-रिक्षाचा भीषण अपघात – सविस्तर बातमी

वारजे माळवाडी भागातील राहुल पार्क सोसायटीत मध्यरात्री सव्वाबाराच्या एका स्टेशनरी दुकानात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. दुकानातील साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली, तसेच मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाल्याने रहिवासी घाबरले. आगीची झळ स्टेशनरी दुकानाच्या शेजारी असलेल्या गणेश भेळ या दुकानाला बसली. आगीच मााहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवान रमेश भिलारे, धर्मराव माने, निलेश तागुंदे , सिद्धेश भगत, आशिष पांगसे, दत्तात्रय शेटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. दुकानात कोणी नसल्याची खात्री केली. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×