Breking News
‘वंदे भारत’ रुळावरून घसरलीआंबेडकरी चळवळ कोणाच्याही आरक्षणाच्या विरोधात नाही; पण अन्यायकारक उपवर्गीकरण खपवून घेतले जाणार नाही!बियाणे उत्पादक कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्नरेस्टॉरंट, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून चीज ॲनालॉग वापरासंदर्भात ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारकआला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा – विशेष लेखपुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत तस्करांना दणकाबुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीपुण्यात अनधिकृत वास्तव्य, ३ बांग्लादेशी महिला ताब्यातपुण्यात रांका ज्वेलर्सला मॅनेजरनेच घातला १८ कोटींचा गंडापुण्यात मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा

चालकाने लांबवले १५ लाखांचे दागिने, आरोपीला अटक

विमानतळ पोलिसांनी आरोपीला केली अटक

marathinews24.com

पुणे – गाडीच्या चालकानेच मालकाच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून १५ लाखांचे सोने चोरून नेल्याची घटना विमानतळ परिसरात घडली होती. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजेश परशुराम कांबळे (वय ४०, रा. कलवड वस्ती, लोहगाव परिसर) याला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात मध्यवर्ती भागात गुन्हेगारांचा अड्डा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील विश्वासू चालकानेच मालकाच्या आईचे सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १५ लाख रुपये किंमतीचे सोने हस्तगत केले आहे. दागिने चोरीच्या घटनेबाबत फिर्यादीने २० एप्रिलला त्यांच्या आईचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना घरातील चालकावर संशय आला. राजेश परशुराम कांबळे (वय ४०) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेले दागिने वितळवून त्यापासून सोने तयार केल्याचेही समोर आले. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे १५ लाख रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके, उपनिरीक्षक नितीन राठोड, अंकुश जोगदंड, लालू कऱ्हे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×