Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

वडगाव शेरी, उरळी देवाची परिसरात घरफोडी

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

चंदननगर आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याच्या घटना वडगाव शेरी, उरळी देवाची परिसरात घडल्या आहेत. याप्रकरणी चंदननगर आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.

पुण्यात जुन्या वादातून तरुणाचा खून; चौघांना अटक – सविस्तर बातमी

वडगाव शेरीतील नामदेवनगरातील आदर्श पात्रा इमारतीतून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातून ५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ८७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २४ एप्रिलला सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास केला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे तपास करीत आहेत.

उरळी देवाची परिसरातील मंतरवाडीतील शिवकृपा निवासातून चोरट्यांनी चार हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख चार हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २५ एप्रिलला सकाळी दहा ते संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×