डॉ. पल्लवी अहिरे-शेळके यांची माहिती; बाणेरमधील ‘स्किनएथिक्स’ने आणले भारतातील पहिले प्रगत तंत्रज्ञान
marathinews24.com
पुणे – बदलती जीवनशैली, जिमसाठी मर्यादित वेळ आणि झटपट परिणामांची वाढती अपेक्षा यामुळे फिटनेस क्षेत्रात ‘मसल टोनिंग’ हा नवा सायन्स-बेस्ड ट्रेंड ठरत आहे. फक्त वजन कमी करणे म्हणजे शरीर सुदृढ होणे नव्हे; शरीर खरोखर सुदृढ होण्यासाठी आणि योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी संपूर्ण शरीरातील स्नायू वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शास्त्रक्रियेविना वजन कमी करण्यासह सुदृढ स्नायू आणि सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावी ठरत आहे. या जागतिक तंत्रज्ञानाचे भारतामधील पहिले ‘वंडर एक्सॉन’ प्रगत तंत्रज्ञानाधारित उपचारपद्धती बाणेर येथील स्किनएथिक्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे, अशी माहिती प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ व स्किनएथिक्स हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉ. पल्लवी अहिरे-शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी स्किनएथिक्स येथील डॉ. कांचन मुळे, डॉ. प्राजक्ता शर्मा, डॉ. प्रियांका बोबडे, बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे संस्थापक डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते.
पुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवली – सविस्तर बातमी
अठरा वर्षांहून अधिक वैद्यकीय अनुभव असलेल्या डॉ. पल्लवी अहिरे-शेळके म्हणाल्या, “गेल्या बारा वर्षांपासून स्किनएथिक्स हॉस्पिटल पुण्यात त्वचा, केस आणि सौंदर्य उपचारांच्या क्षेत्रात आधुनिक आणि सुरक्षित उपचार सुविधा देत नवे मानदंड निर्माण करत आहे. त्वचारोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येथे उपचार केले जातात. त्वचा, केस आणि लेझर उपचारांसोबतच आता शरीराच्या आकारामध्ये सुधारणा करणारे उपचारही येथे उपलब्ध आहेत. आधुनिक त्वचारोगशास्त्र, प्रगत यंत्रणा आणि जीवनशैली मार्गदर्शन यांच्या मदतीने सुरक्षित, परिणामकारक आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम देण्यावर भर दिला जातो. पुण्यातील रुग्णांना जागतिक दर्जाचे, उपचार देण्याचे स्किनएथिक्सचे उद्दिष्ट आहे.”
“स्किनएथिक्सची कार्यपद्धती वेगळी असून, केवळ बाहेरून दिसणारी समस्या कमी करण्यावर नाही, तर त्यामागील मूळ कारण समजून दीर्घकालीन आणि टिकाऊ परिणाम देण्याच्या उद्देशाने आम्ही वैद्यकीय सेवा पुरवतो. प्रत्येक रुग्णाला प्रामाणिक सल्ला, वैयक्तिक उपचार योजना आणि वैज्ञानिक आधारावर उपचार दिले जातात. ‘वंडर एक्सॉन’ ही एक शस्त्रक्रिया न करता केली जाणारी आधुनिक शरीररचना सुधारणा पद्धत आहे. या तंत्रज्ञानामध्ये उच्च क्षमतेचे न्यूरोमस्क्युलर स्टिम्युलेशन आणि रेडिओफ्रिक्वेन्सी यांचा एकत्रित वापर केला जातो. या दोन्ही तंत्रज्ञानामुळे स्नायू मजबूत होतात आणि त्वचा ताणली जाते. त्यामुळे शरीराचा आकार अधिक टोन होतो, त्वचेतील घट्टपणा वाढतो आणि चरबी कमी होण्यास मदत होते, याचा उपयोग शारीरिक व्याधींमुळे व्यायाम न करू शकणाऱ्या रुग्णांना, युरिनरी इन्कॉन्टिनन्स, डायस्टॅसिस तसेच जीएलपी इंजेक्शन्स घेत असताना स्नायू कमी होणाऱ्या रुग्णांना घेता येईल,” असेही त्यांनी सांगितले.























