Breking News
सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हाअडीच कोटींचे सोने घेऊन कारागिर पसारआकाशवाणी पुणे केंद्रावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ विषयावर विशेष मुलाखत प्रसारितपुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळखशेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगडअटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेख

कोथरूड परिसरात तरुणावर शस्त्राने वार

कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कोथरूडमधील केळेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी चैाघांविरुद्ध पोलिसंनी गुन्हा दाखल केला. आदित्य उर्फ सनी राजू गाडे (वय २१, रा. केळेवाडी, कोथरूड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी राहुलसिंग टाक, अनिलसिंग टाक, पिंटूसिंग दुधाणी, सुखासिंग दुधाणी यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गायत्री आदित्य गाडे (वय १९) हिने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडे यांच्या नात्यातील एका तरुणीचे आरोपी राहुलसिंग टाक याने पळवून नेले होते. या कारणावरुन गाडे आणि साथीदारांनी राहुलसिंग टाक याच्यावर सांगली जिल्ह्यातील आष्टा परिसरात शस्त्राने वार केले होते. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाले होते. ३ मे रोजी रात्री आदित्य हा कोथरूडमधील केळेवाडी परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला अडविले. शिवीगाळ करुन आरोपींनी आदित्य याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपीने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

वैमनस्यातून तरुणाला सिंमेटच्या गट्टूने मारहाण

पुणे- वैमनस्यातून तरुणाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला. हडपसरमधील काळेपडळ परिसरात ही घटना घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश संजू बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दुर्वांग मानकर, साहिल शेलार (दोघे रा. ससाणेनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बिरादार याची पत्नी अपेक्षा हिने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बिरादार याची तीन महिन्यांपूर्वी आरोपींशी भांडणे झाले होते. वादातून आरोपी आणि साथीदारांनी हडपसरमधील ससाणेनगर परिसरात ३ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गणेशला शिवीिगाळ करुन त्याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. पोलीस उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×