Breking News
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जापैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकलेपुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयेवलेवाडी परिसरात चिमुरडीवर अत्याचारपुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पणबिबवेवाडीत मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रयगांजा विक्री करणारे रिक्षाचालक गजाआडआपुलकी कर्करोग रूग्णालयाचा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोयत्याचा धाक दाखवून दाम्पत्याला शिवीगाळ, आरोपीला अटकखडकवासल्यात ‘हिट अँड रन’ मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला सासरच्यांकडून मारहाण

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत असलेल्या व्यक्तीला मुलांना भेटण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर सासरच्यांनी मारहाण केल्याचा प्रकार कोथरुड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार ८ मे रोजी घडला असून, याप्रकरणी १६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नारायण पांडुरंग जानकर (वय ४८, रा. किष्कींदानगर, कोथरुड) यांनी गुरुवार पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मयुरी नारायण जानकर, सुरेश लक्ष्मण बावदाने, महेश लक्ष्मण बावदाने, संगीता महेश बावदाने, भगवान बाबू मरगळे आणि लक्ष्मण राया बावदाने (रा. सुतारदरा, कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटीलवर आरोपपत्र दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत आहेत. मुलांची आठवण आल्याने त्यांनी आरोपी महेश बावदाने याच्याशी संपर्क साधून मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आले. तक्रारदार हे ग्रीललाईन मेडिकलसमोर, कर्वे रस्ता परिसरात पोहोचले असता त्यांची पत्नी आणि अन्य आरोपी तेथे आले. वेगळे राहत असल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे. यानंतर आरोपींनी तक्रारदाराला रिक्षातून मुलांना भेटण्यासाठी नेण्याचे सांगितले. मात्र, त्यांना सुतारदरा येथील मोकळ्या मैदानात नेऊन दगड आणि बांबूने मारहाण करण्यात आली. तसेच अन्य आरोपींनीही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काही काळ तक्रारदाराला घरात कोंडून ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×