कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पार्टटाईम जॉब देण्याचे आमिष दाखवत कोथरुडमधील एका व्यक्तीची ४ लाख ७१ हजार ७०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २५ मार्च ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत घडला.
मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला सासरच्यांकडून मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदाराच्या मोबाइलवर संपर्क साधून आपण ‘टाईम जॉब’ पोर्टलकडून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधितांना पार्टटाईम जॉब उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. जॉबसाठी नोंदणी करावी लागेल, असे सांगत आरोपींनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन फी भरण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे पुढे करत आणखी पैसे भरण्याची मागणी करण्यात आली. आरोपींनी विश्वास संपादन करून वेळोवेळी रक्कम स्वीकारत तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणात मोबाइल धारक व वापरकर्ते, मेल आयडी धारक व वापरकर्ते तसेच बँक खातेधारक व वापरकर्त्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोथरुड पोलिस करत आहेत.






















