नातेवाईक आरोपी अटकेत
marathinews24.com
पुणे – शहरातील येवलेवाडी परिसरात आठ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिबवेवाडीत मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रय – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वय आठ वर्षे सहा महिने नऊ दिवस असून १४ मे घटना रोजी घडली. मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपी हा पीडितेचा नातेवाईक आहे. आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही मूळचे नेपाळचे रहिवासी असून उदरनिर्वाहासाठी येवलेवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. दोन्ही कुटुंबे शेजारी शेजारी राहत होती. आरोपी किरकोळ काम करून उदरनिर्वाह करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने उद्यापर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.






















