दुकानदाराला दमदाटी करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलीसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – दुकानदाराला धमकावून त्याच्याकडे दरमहा हप्ता मागितल्याप्रकरणी एका सराइताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. अरबाज मैनुद्दीन कुरेशी (वय २८, रा. भीमपूरा, लष्कर आणि राजेवाडी, नाना पेठ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वारगेट एसटी स्टँडसह पुणे रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात दुकान आहे. आरोपी कुरेशीने त्यांना दरमहा हप्ता देण्याची मागणी करुन धमकाविले होते. या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी त्याने दिली होती. व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील १५ हजार ८०० रुपयांची रोकड कुरेशीने लुटली होती. कुरेशीच्या धमकीमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.